VIDEO : लाजिरवाणा पराभवानंतर KL राहुलला मालकाने फटकारले? सर्वांसमोर घेतली शाळा

IPL 2024 SRH vs LSG : आयपीएल 2024 मधील 57 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या सलामीच्या जोडीने अवघ्या 9.4 षटकांत हा सामना जिंकला होता.
kl rahul scolded by lsg owner sanjeev goenka news
kl rahul scolded by lsg owner sanjeev goenka newssakal

IPL 2024 SRH vs LSG : आयपीएल 2024 मधील 57 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या सलामीच्या जोडीने अवघ्या 9.4 षटकांत हा सामना जिंकला होता. हैदराबादचा या हंगामातील सातवा विजय तर लखनौचा सहावा पराभव आहे.

या विजयासह सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. लखनौचा हा पराभव अतिशय लाजिरवाणा आहे कारण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा संघ इतक्या वाईट पद्धतीने पराभूत झाला आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि फ्रँचायझी मालक संजीव गोयंका बोलताना दिसत आहेत.

kl rahul scolded by lsg owner sanjeev goenka news
SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

केएल राहुलला मालकाने फटकारले?

लखनौच्या पराभवानंतर केएल राहुल संजीव गोयंका यांच्याशी बोलताना दिसला, पण गोयंका यांच्या बॉडी लँग्वेजवरून असे दिसते की तो लखनौच्या परफॉर्मन्सवर रागावला.

दुसरीकडे राहुल त्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की राहुलला बॉसकडून फटकारले जात होते, मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 165 धावा केल्या. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या सलामीच्या जोडीने लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. हैदराबादने अवघ्या 9.4 षटकांत हा सामना जिंकला. हैदराबादकडून फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने 89 आणि अभिषेक शर्माने 75 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com