
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलला एक गोड बातमी मिळाली. सोमवारी (२४ मार्च) केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीने मुलीला जन्म दिला. त्यामुळे ते आई-बाबा झाले आहेत.
केएल राहुल त्याच्या मुलीच्या जन्मामुळे आयपीएल २०२५ मधील दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्याला मुकला होता. दिल्लीने सोमवारीच लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रोमांचक विजय मिळवला होता.