KKR vs MI : केकेआर क्वालिफाय! दमदार सुरूवातीनंतर मुंबई ढेपाळली

KKR vs MI Varun Chakaravarthy
Kolkata Knight Riders First Team To Qualify For IPL 2024 Play Ofesakal

Kolkata Knight Riders First Team To Qualify For IPL 2024 Play Off : केकेआरचा संघ होम ग्राऊंडवर मुंबईला मात देऊन प्ले ऑफ गाठण्यासाठी फार उत्सुक होता. मात्र वरूणराजानं केकेआरची चांगलीच परीक्षा पाहिली. टॉस होण्याआधी वरूणराजा चांगलाच बरसला. दोन्ही संघ हातावर हात ठेवून पॅव्हेलियनमधून वरूण राजाची तुफान बॅटिंग पाहत बसले होते. अखेर वरूण राजानं आपली इनिंग संपवली अन् केकेआरसाठी मैदान मोकळं केलं.

नाणेफेक मुंबईनं जिंकली मात्र सामना केकेआरनं खिशात टाकला. प्रत्येकी 16 ओव्हरचा झालेल्या सामन्यात केकेआरनं खराब सुरूवातीनंतरही 20 ओव्हरमध्ये 7 बाद 157 धावा ठोकल्या. त्यानंतर मुंबईची कडवी झुंज मोडून काढत सामना 18 धावांनी जिंकला. वरूणराजानंतर वरूण चक्रवर्तीनं दमदार गोलंदाजी केली.

KKR vs MI Varun Chakaravarthy
James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

केकेआरच्या बॅटिंगबद्दल बोलायचं झालं तर मुंबईचा कॅप्टन हार्दिकनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यानंतर तुषारा अन् बुमराहनं केकेआरची अवस्था 2 बाद 10 धावा अशी केली. यानंतर मात्र व्यंकटेश अन् श्रेयस या दोन अय्यरनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केकेआरनं 4 षटकात 40 धावा करत आपली घसरलेली गाडी रुळावर आणली होती. मात्र अंशुल कामबोजनं कॅप्टनचा पत्ता कट केला. तसाही अय्यर 10 चेंडूत 7 धावा करून अडखळतच खेळत होता.

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर व्यंकटेशला खऱ्या अर्थानं साथ दिली ती नितीश राणानं. अय्यर अन् राणा या जोडीनं धावगती फारशी ड्रॉप होऊ न देता संघाला 8 षटकात 77 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र चावलानं अय्यरचं अर्धशतक काही पूर्ण होऊ दिलं नाही. अय्यर 42 धावा करून बाद झाला.

नितीश राणा देखील 23 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. नितीश बाद झाला त्यावेळी केकेआरने 12 षटकात 116 धावांपर्यंत मजल मारली होती. रसेल देखील 14 चेंडूत 24 धावा करत बाद झाला. केकेआरची सर्व मदार आता रिंकू सिंहवर होती. त्यानं 12 चेंडूत 20 धावा ठोकल्या. तर रमनदीप सिंहनं 7 चेंडूत 17 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. केकेआरनं 20 षटकात 7 बाद 157 धावांपर्यंत मजल मारली.

KKR vs MI Varun Chakaravarthy
Rishabh Pant Suspended : कर्णधार ऋषभ पंतवर BCCIची मोठी कारवाई; घातली एका सामन्याची बंदी, जाणून घ्या कारण

मुंबई इंडियन्सला सामना जवळपास 10 च्या रन रेटनं धावा करणं गरजेचं होतं. रोहित अन् इशान किशननं धडाकेबाज सुरूवात करून दिली. 6 षटकात 65 धावांचा टप्पा गाठून मुंबईन सामन्यावर पकड निर्माण केली. यात किशनच्या 40 धावांचा मोठा वाटा होता. मात्र पॉवर प्ले संपला अन् मुंबईची उलटी गिनती सुरू झाली.

नाराणयनं आधी इशानला टिपलं त्यानंतर वरूण चक्रवर्तीनंं रोहितला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईची बॅक बोन असलेली सलामी जोडी आठव्या षटकात माघारी फिरली. त्यानंतर रसेलने सूर्याला तळपूच दिलं नाही. तो 11 धावांची भर घालून माघारी परतला. मुंबईनं तरी 10 षटकात 87 धावांपर्यंत मजल मारली होती.

हळूहळू मुंबईच्या हातून सामना निसटत होता. चक्रवर्तीनं हार्दिकला बाद करत मुंबईला अजून एक धक्का दिला. बारावं षटक आलं तरी मुंबई अजून शंभरी गाठू शकली नव्हती. त्यात रसेलने टीम डेव्हिडला बाद केलं.

मुंबईला आता शेवटच्या दोन षटकात 41 धावांची गरज होती. आव्हान तसं अवघड होतं. मात्र नमन धीरनं रसेलला दोन षटकार अन् एक चौकार मारत 15 व्या षटकात 19 धावा वसूल केल्या. आता मुंबईसमोर 6 चेंडूत 22 धाावांच टार्गेट होतं.

शेवटचं षटक टाकणाऱ्या हर्षित राणानं मुंबईच्या नमनला पहिल्याच चेंडूवर चालतं केलं अन् केकेआरला धीर दिला. राणाजींनी तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माची 32 धावांची खेळी संपवली अन् केकेआरच्या प्ले ऑफ तिकीटावर शिक्कामोर्तब केलं.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com