DC vs KKR IPL 2024 : फक्त 5 धावा.... रिंकू-रसेल जोडीचा जलवा, केकेआर हैदराबादचं रेकॉर्ड मोडता मोडता राहिलं

Kolkata Night Riders Score 2nd Highest Team Score Of IPL History
Kolkata Night Riders Score 2nd Highest Team Score Of IPL Historyesakal

Kolkata Night Riders Score 272 Runs 2nd Highest Team Score Of IPL History : आयपीएलच्या 16 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 20 षटकात 272 धावा ठोकून आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. केकेआरकडून सलामीवीर सुनिल नारायणने 39 चेंडूत 85 धावांची धडाकेबाज खेळी करत चांगली सुरूवात करून दिली. तर पदार्पण करणाऱ्या रघुवंशीने 54 धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केलं.

यावर कडी म्हणून आंद्रे रसेल आणि रिंकू सिंहने स्लॉग ओव्हरमध्ये तडाखे देत केकेआरला 250 पार पोहचवले. रिंकूने 8 चेंडूत 26 तर रसेलने 19 चेंडूत 41 धावा ठोकल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात इशांत शर्माने टिच्चून मारा करत केकेआरचे आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा सनराईजर्स हैदाराबादचा यंदाच्या हंगामात झालेला विक्रम मोडण्याचा मनसुबा उधळून लावला.

Kolkata Night Riders Score 2nd Highest Team Score Of IPL History
Rohit Sharma IPL 2024 : नाराज रोहित शर्मा हार्दिक प्रकरणानंतर मुंबई इंडियन्स सोडणार?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरला सुनिल नारायण आणि फिल्प सॉल्ट यांनी केकेआरला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेच्या 4 षटकातच संघाला 58 धावांपर्यंत पोहचवलं. यात नारायणच्या 15 चेंडूत 34 धावांचा मोठा वाटा होता. सॉल्ट बाद झाल्यानंतर पदार्पण करणारा अंगकृश रघुवंशी आला.

त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटके मारण्यास सुरूवात केली. नारायण आणि रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची दमदार भागीदारी रचली. या दोघांनी केकेआरला 12 व्या षटकातच 150 शतकी मजल मारून दिली होती. दरम्यान, नारायण आपल्या शतकाजवळ पोहचला असं वाटत असतानाच मिचेल मार्शने त्याची खेळी 85 धावांवर संपुष्टात आणली.

Kolkata Night Riders Score 2nd Highest Team Score Of IPL History
GT vs PBKS Playing 11 IPL 2024 : पराभवानंतर पंजाबचा कर्णधार करणार संघात बदल... गिल विनिंग कॉम्बिनेशन घेऊनच मैदानात उतरणार?

नारायण बाद झाल्यावर अगकृषने आपले अर्धशतक 25 चेंडूत पूर्ण केलं. मात्र नॉर्खियाने त्याची अर्धशतकी खेळी 54 धावांवर संपुष्टात आणली. दिल्लीला दिलासा मिळाला असं वाटलं. मात्र आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी धुवांधार फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. रसेलने 19 चेंडूत 41 तर रिंकू सिंहने 8 चेंडूत 26 धावा ठोकल्या.

हे दोघे खेळत असताना केकेआर याच हंगामात हैदराबादने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम मोडणार की काय असे वाटत होते. मात्र 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नॉर्खियाने रिंकूला बाद केलं.

त्यानंतर 20 व्या षटकात इशांत शर्माने रसेलला बाद करत केकेआरचे 277 धावांचा टप्पा पार करण्याच्या मनसुब्यांना सुरूंग लावला. अखेर केकेआर 20 षटकात 272 धावांपर्यंत मजल मारू शकली. ही आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सांघिक धावसंख्या ठरली.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com