
एका IPL सीझनमध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' या भारतीय खेळाडूच्या नावावर
आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. हंगामात आतापर्यंत 41 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये देश-विदेशातील अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे. या खेळाडूंपैकी एक 27 वर्षीय अनुभवी चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आहे. गेल्या दोन मोसमात तो KKR साठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता, पण त्याला दिल्लीत संधी मिळताच त्याने संधीच सोन केलं.(Kuldeep Yadav Most Man Of The Match Awards IPL Season)
हेही वाचा: 'त्या' नो-बॉलच्या वादावर अखेर रिकी पाँटिंगने तोडले मौन
दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात त्याने त्याच्या जुन्या फ्रेंचायझी KKR विरुद्ध पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत चार विकेट मिळवल्या. तत्पूर्वी, त्याने केकेआरविरुद्धच्या लढतीतही दिल्लीचे चार विकेट घेतल्या होत्या. कुलदीपने केकेआरविरुद्ध एकूण तीन षटके टाकली. यादरम्यान त्याने केवळ 14 धावा खर्च करून आपल्या संघाला सर्वाधिक चार यश मिळवून दिले. कुलदीपने काल ज्या चार फलंदाजांना आपला बळी बनवले त्यात विरोधी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, बाबा इंद्रजीत, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांचा समावेश आहे. केकेआरविरुद्धच्या या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.
कुलदीप यादवची या हंगामात चौथ्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड झाली आहे. आयपीएलच्या इतिहासातील त्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलूया ज्यांनी एका हंगामात चांगली कामगिरी करताना सर्वाधिक वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला आहे, तर या यादीत पहिले नाव येते आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचे. आयपीएलच्या एका मोसमात भारतीय खेळाडू म्हणून त्याने पाच वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला आहे.
कोहलीनंतर तीन खेळाडूंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुंबईचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलच्या एका हंगामात अनुक्रमे चार वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला आहे.
Web Title: Kuldeep Yadav Most Man Of The Match Awards In An Ipl Season By Indians
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..