Video : लॉकी फर्ग्यूसनने टाकला IPL 2022 चा सर्वात वेगवान चेंडू | Lockie Ferguson fastest ball in IPL 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lockie Ferguson fastest ball in IPL 2022

Video : लॉकी फर्ग्यूसनने टाकला IPL 2022 चा सर्वात वेगवान चेंडू

Most Fastest Ball In IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनल होत आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने राजस्थान रॉयल्स विरुद्ध आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात 157.3kmph वेगाने बॉल टाकला. आयपीएलच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडूंच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा: IPL GT vs RR Live : राजस्थानने फायनलमध्ये गुजरातसाठी 131 धावांचे ठेवले लक्ष्य

राजस्थान रॉयल्सच्या डावच्या पाचव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या फर्ग्युसनने तिसरा चेंडू ताशी 154 किमी वेगाने टाकला. त्यानंतरच त्याने पुढचा चेंडू ताशी 153 किमी वेगाने केला. फर्ग्युसनने षटकातील शेवटचा चेंडू 157.3 किमी प्रतितास वेगाने टाकला. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे. 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, टाटने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेल्या आरोन फिंचला 157.7 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली .

हेही वाचा: संजू सॅमसनच्या चौकाराने हंगामातील 'माईल स्टोन' देखील पार

आयपीएल या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रोव्हमन पॉवेलसमोर 157 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकला होता. अल्झारी जोसेफच्या जागी फर्गसुयानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.

Web Title: Lockie Ferguson Breaks Umran Malik Fastest Ball In Ipl 2022 Final Gt Vs Rr

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLIPL 2022Umran Malik
go to top