
संजू सॅमसनच्या चौकाराने हंगामातील 'माईल स्टोन' देखील पार
Most Fours In IPL 2022 : आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनल होत आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जैसवाल स्वस्तात माघारी गेल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने चौकार मारत आपले खाते उघडले. हा चौकार हंगामातील माईल स्टोन पार करणारा चौकार ठरला. हा यंदाच्या आयपीएल हंगामातील 2000 वा चौकार होता.
हेही वाचा: IPL Final सुरू होण्यापूर्वीच झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघाने कोणताही बदल केला नाही. गुजरात संघात एक बदल करण्यात आला असून, अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा: IPL GT vs RR Live : राजस्थानला तिसरा धक्का; पडिक्कल बाद
राजस्थान रॉयल्स संघाने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र यशस्वी जैसवाल 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर बटलर आणि संजू सॅमसनने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र हार्दिक पांड्याने संजूला 14 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. पडिक्कल 2 धावांची भर घालून परतला. यानंतर बटलरने आक्रमक फलंदाजी करत 39 धावांपर्यंत मजल मारली मात्र हार्दिकने त्याला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.
नाणेफेकीपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. आजचा सामना जवळपास 1 लाख 30 हजार प्रेक्षकांसमोर खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्स आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यांचा पहिलाच हंगाम असल्याने पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घालणार की राजस्थान दुसऱ्यांदा आयपीएलवर नाव कोरणार याची उत्सुकता आहे.
Web Title: Most Fours In Ipl 2000 Four Yet Another Milestone In Tata Ipl 2022 Final Match Gt Vs Rr
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..