LSG vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या

मार्कस स्टॉयनिसच्या फटकेबाजीमुळे लखनौचा विजय
lsg vs mi ipl 2023 lucknow super giants vs mumbai indians todays ipl match 63
lsg vs mi ipl 2023 lucknow super giants vs mumbai indians todays ipl match 63 sakal

लखनौ : लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने मंगळवारी मुंबई इंडियन्सचा विजयी झंझावात रोखला. कृणाल पंड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने मुंबई इंडियन्सवर ५ धावांनी निसटता विजय साकारला आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आव्हान कायम राखले. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाचा हा सातवा विजय ठरला. मुंबई इंडियन्सला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

लखनौकडून मिळालेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईच्या रोहित शर्मा व इशान किशन या सलामीवीरांनी ९० धावांची भागीदारी करताना दमदार सुरुवात केली. रोहित याने ३७ धावांची खेळी केली. रवी बिश्‍नोईच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. इशानने ३९ चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी केली. त्याने आपली खेळी ८ चौकार व १ षटकाराने सजवली.

इशान बाद झाल्यानंतर मुंबईच्या इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. सूर्यकुमार यादव (७ धावा), नेहल वधेरा (१६ धावा) व विष्णू विनोद (२ धावा) यांच्याकडून निराशा झाली. यश ठाकूरने महत्त्वाचे दोन फलंदाज बाद केले. टीम डेव्हिड (नाबाद ३२ धावा) याने मुंबईच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण त्यांना २० षटकांत ५ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

lsg vs mi ipl 2023 lucknow super giants vs mumbai indians todays ipl match 63
Mohammed Shami IPL 2023 : ''गुजरातमध्ये मला माझे जेवण नाही मिळत...', असे का म्हणाला मोहम्मद शमी? VIDEO होतोय व्हायरल

जेसन बेहरेनडॉर्फ, पियूष चावला यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे लखनौ संघाने ३५ धावांमध्येच तीन विकेट गमावल्या. कर्णधार कृणाल पंड्या व अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस या जोडीने लखनौचा डाव सावरला. दोघांनी ८२ धावांची भागीदारी करताना लखनौच्या धावसंख्येत भार घातली. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच कृणाल ४९ धावांवर रिटायर्ड हर्ट अर्थातच जखमी होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

lsg vs mi ipl 2023 lucknow super giants vs mumbai indians todays ipl match 63
IPL 2023 Playoffs Scenario: लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्माची मुंबई प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर? समजून घ्या समीकरण

स्टॉयनिसचा धमाका

मार्कस स्टॉयनिस याने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने निकोलस पुरनच्या साथीने नाबाद ६० धावांची भागीदारी रचली. मात्र या भागीदारीत पुरनचा वाटा होता फक्त ८ धावांचा. स्टॉयनिस याने ४७ चेंडूंमध्ये ४ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी साकारली. संक्षिप्त धावफलक ः लखनौ २० षटकांत ३ बाद १७७ धावा (कृणाल पंड्या ४९, स्टॉयनिस नाबाद ८९, बेहरेनडॉर्फ २/३०) विजयी वि. मुंबई २० षटकांत ५ बाद १७२ धावा (इशान किशन ५९, रोहित शर्मा ३७, टीम डेव्हिड नाबाद ३२, बिश्‍नोई २/२६).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com