SRH vs LSG, IPL Today Match Marathi Update: सनरायझर्स हैदराबादने कितीही तगडं लक्ष्य उभं केलं, तरी आम्ही त्याचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी सज्ज आहोत, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेकी दरम्यान सहकाऱ्यांमध्ये भरलेला जोश मैदानावर दिसला. अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड या इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील सर्वात घातक ओपनर्सना रोखण्याचे आव्हान स्वीकारून LSG चे गोलंदाज मैदानावर उतरले. लेट एन्ट्री झालेल्या शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) तिसऱ्या षटकात SRH ला लागोपाठ दोन धक्के दिले. पण, खरा डेंजर खेळाडू मैदानावर होता, त्यात त्याला निकोलस पूरन व रवी बिश्नोई यांनी झेल सोडून दोन जीवदान दिले होते. त्यामुळे SRH ची मालकीण काव्या मारनच्या जीवात जीव आला होता. पण, हा आनंद क्षणिक ठरला.