
IPL 2022 : आई रूग्णालयात असतानाही आवेश खान उतरला मैदानात
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 12 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giant) सनराईजर्स हौदराबादचा (Sunrisers Hyderabad) 12 धावांनी पराभव केला. लखनौच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan). त्याने हैदराबादचे 4 फलंदजा बाद करत संघाच्या विजयात मोठी भुमिका बजावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. विशेष म्हणजे आवेश खानने त्याची आई (Avesh Khan Mother) रुग्णालयात असतानाही खेळण्याचा निर्णय घेतला आणि लखनौच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
हेही वाचा: नट्टूची टी 20 वर्ल्डकपमध्ये कमतरता जाणवली : रवी शास्त्री
लखनौ आणि हैदराबाद यांच्यातील सामना संपल्यानंतर सामन्याचा हिरो आवेश खानने दीपक हुड्डासोबत चर्चा करत होता. त्यावेळी आवेश खानने सांगितले की माझी आई आजारी आहे. ती रूग्णालयात आहे आणि मी इथे संघासाठी माझे कर्तव्य बजावत आहे. या गोष्टीनंतर आवेश खानचे चाहत्यांनी कौतुक केले. आवेश खान आपला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपल्या आईला समर्पित करणार आहे. आवेश खानची आई सध्या रूग्णालयात उपचार घेत आहे.
हेही वाचा: IPL 2022 : युजी-देवदत्तवर 'धर्मसंकट'; जाफरला आठवलं 'महाभारत'
आवेश खानने लखनौ सुपर जायंटचा विजय हैदराबादच्या दाढेतून काढून आणला. त्याने 18 व्या षटकात आक्रमक पवित्र्यात फलंदाजी करणाऱ्या निकोलस पुरनला, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अब्दुल समदला देखील बाद केले. निकोलस पुरन धडाकेबाज फलंदाजी करत होता. त्यामुळे आवेश खानचे 18 वे षटक हे सामन्याचा निकाल बदलणारे ठरले.
Web Title: Lucknow Super Giant Avesh Khan Mother In Hospital During Sunrisers Hyderabad Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..