Maharashtra Women Win 57th National Kho-Kho Championship : पुरी (ओडिशा), ४ एप्रिल – ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमाखदार खेळी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान ओडिशावर २५-२१ असा थरारक विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष गटात रेल्वेच्या संघाने गतविजेत्या महाराष्ट्राला ३६-२८ अशी मात देत बाजी मारली. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांचे हे २६ वे तर रेल्वेचे १२ वे अजिंक्यपद ठरले आहे.