ओल्ड धोनीचा गोल्ड फिनिश; रोहितच्या पदरी सातवा पराभव |Mahendra singh Dhoni Last Ball Boundary Mumbai Indians | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahendra singh Dhoni Last Ball Boundary Mumbai Indians 7th Defeat in 7 Match

ओल्ड धोनीचा गोल्ड फिनिश; रोहितच्या पदरी सातवा पराभव

मुंबई : महेंद्र सिंह धोनीने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारत मुंबईविरूद्धचा सामना 3 विकेट्सनी जिंकून दिला. मुंबईने 156 धावांचे टार्गेट जीव तोडून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेटोरियस आणि धोनीने अखेर मॅच फिनिशिंग इनिंग खेळली. त्यामुळे मुंबईची विजयाची पाटी सातव्या सामन्यातही कोरीच राहिली.

मुंबईच्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला आयपीएल पदार्पण करणाऱ्या डॅनियल सॅम्सने बाद केले. त्यानंतर मोईन अलीच्या जागी आलेल्या मिशेल सँटनरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा प्रयोग फसला. त्याला सॅम्सने 11 धावांवर बाद केले. (Mahendra singh Dhoni Last Ball Boundary Mumbai Indians 7th Defeat in 7 Match)

हेही वाचा: MI vs CSK : भीलवाडाच्या मुकेश चौधरीने केला भीम पराक्रम

चेन्नईच्या दोन विकेट स्वस्तात माघारी गेल्यानंतर रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडूने सीएसकेचा डाव सावरला. मात्र जयदेव उनाडकटने उथप्पाला 30 धावांवर बाद करत सीएसकेला तिसरा धक्का दिला. सीएसकेचा हार्ड हिटर शिवम दुबेने 14 चेंडूत 13 धावा केल्या. मात्र त्याला डॅनियल सॅम्सने बाद करत सीएसकेला शंभरच्या आत चौथा धक्का दिला. दुबेला फक्त एक षटकार मारण्यात यश आले. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सीएसकेच्या अंबाती रायुडूने एक बाजू लावून धरली होती. मात्र डॅनियल सॅम्सने आपल्या शेवटच्या षटकात 35 चेंडूत 40 धावा करणाऱ्या रायुडूला बाद केले. रायुडूनंतर आलेल्या रविंद्र जडेजाही 3 धावा करून बाद झाला.

दरम्यान, चेन्नईच्या धावा आणि चेंडू याच्यातील अंतर वाढत जात होते. मात्र प्रिटोरियसने फटकेबाजी करत सामना 6 चेंडूत 17 धावा असा आणला. मात्र शेवटचे षटक टाकणाऱ्या जयदेव उनाडकटने पहिल्याच चेंडूवर 13 चेंडूत 22 धावा करणाऱ्या प्रेटोरियसला बाद केले. ब्राव्होने पाचव्या चेंडूवर 1 धाव घेत स्ट्राईक धोनीकडे दिले. त्याने चौथ्या चेंडूवर थेट षटकार मारत सामना 3 चेंडूत 10 धावा असा आणला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत माहीने सामना दोन चेंडूत 6 धावा असा आणला. त्यानंतर धोनीला दुसऱ्या चेंडूवर 2 धावा करता आल्या. त्यामुळे सीएसकेला सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावा हव्या होत्या. धोनीने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत सामना जिंकून दिला. धोनीने 13 चेंडूत 28 धावा केल्या.

हेही वाचा: Rohit Sharma : चौधरीने मुंबईच्या रोहित शर्माला केला बदकांचा बादशाह

आयपीएलच्या हाय व्होल्टेज सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात मुंबईला दोन मोठे धक्के दिले. त्याने रोहित शर्मा आणि इशान किशन या अनुभवी सलामी जोडीला शुन्यावर बाद केले. त्यानंतर त्याने बेबी एबी डेवाल्ड ब्रेविसला देखील बाद करत मुंबईची टॉप ऑर्डर उडवली.

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी जमते असे वाटत असतानाच सँटनरने सूर्यकुमारला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर ऋतिक शौनीकने 25 धावा करत वर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला. शौनीक बाद झाल्यानंतर आलेला पोलार्ड देखील 14 धावांची भर घालून परतला. दरम्यान, तिलक वर्माने आपले झुंजार अर्धशतक पूर्ण केले. त्याला जयदेव उनाडकटने 9 चेंडूत 19 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी मुंबईला 20 षटकात 7 बाद 155 धावांपर्यंत पोहचवले.

Web Title: Mahendra Singh Dhoni Last Ball Boundary Mumbai Indians 7th Defeat In 7 Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top