Mayank Agarwal Praveen Sood : नव्या CBI संचालकांची नियुक्ती होताच मयांक का ट्रेंड होतोय?

Mayank Agarwal Praveen Sood
Mayank Agarwal Praveen Soodesakal

Mayank Agarwal Praveen Sood : कर्नाटकचे DGP राहिलेले 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रविण CBI च्या संचालक पदी निवड झाली. ते सुबोध कुमार जयस्वाल यांची जागा घेणार आहेत. सीबीआयच्या नव्या संचलकांची नियुक्ती झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू मयांक अग्रवाल ट्रेंड करत होता. मयांक अग्रवालने कोणतीही मोठी खेळी केली नाही तर तो त्यांच्या सासऱ्यांमुळे ट्रेंड करू लागला.

Mayank Agarwal Praveen Sood
CSK vs KKR Live : मोठ्या पडझडीनंतर शुवम - जडेजाने चेन्नईला सावरले

नवे सीबीआय संचालक प्रविण सूद हे मयांक अग्रवालचे सासरेबुवा आहेत. मयांक अग्रवालने आशिता सूद हिला अनेक वर्षे डेट केलं होते. या दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केलं.

मयांक अग्रवालने जानेवारी 2018 मध्ये इंडनच्या टेम्स नदीच्या किनाऱ्यावर आशिदा सूदला लंडन आयमध्ये प्रपोज केले होते. आशिताने लगेचच होकार कळवला होता.

Mayank Agarwal Praveen Sood
MS Dhoni CSK : 11 सेकंदाचा तो VIDEO... धोनीला अलविदा म्हणण्याची वेळ आली?

मयांक आणि आशिता यांनी प्रपोज केल्यानंतर लग्न करण्यास फारसा वेळ लावला नाही. त्यांनी 4 जून 2018 मध्ये लग्न केले. मयांक आणि आशिताने नुकतेच एका गोंडस मुलालाही जन्म दिला.

मयांकसाठी यंदाचा आयपीएल हंगाम फारसा चांगला गेलेला नाही. मयंकने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 20.78 च्या सरासरीने फक्त 187 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादनेही त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com