
Ticket Price on Wankhede Stadium For MI vs KKR: आज वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात IPL 2025 मधील १२ वा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स संघ आज घरच्या मैदानावर आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला विजय मिळवेल अशी आशा आहे. यंदाच्या हंगामातील वानखेडेवरील हा पहिला सामना आहे. त्यामुळे क्रिकेटवेड्या मुंबईकरांचा सामन्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आजचा सामना पाहण्यासाठी मुंबईकरांना ५ लाखांपर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे.