IPL 2024: सूर्यकुमारचं रेकॉर्डब्रेक शतक, तर तिलकसह रचली विक्रमी पार्टनरशीप; MI vs SRH सामन्यातील 4 खास विक्रम

Suryakumar Yadav-Tilak Varma Record: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देताना सूर्यकुमारने शानदार शतक केले, तसेच तिलक वर्माबरोबर मोठी भागीदारी केली. यासह मोठे विक्रमही या सामन्यात त्यांनी केले.
Suryakumar Yadav - Tilak Varma | Mumbai Indians
Suryakumar Yadav - Tilak Varma | Mumbai IndiansSakal

Suryakumar Yadav-Tilak Varma Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा 55 वा सामना सोमवारी (6 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 31 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, नंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरला.

एका बाजूने सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा स्वीकारलेला असताना दुसरी बाजू तिलक वर्माने संयमी खेळ करत सांभाळली. त्यामुळे नंतर हैदराबादला एकही विकेट घेता आली नाही. या सूर्यकुमार आणि तिलक यांनी चौथ्या विकेटसाठी 143 धावांची नाबाद भागीदारी करत मुंबईला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.

Suryakumar Yadav - Tilak Varma | Mumbai Indians
MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

या सामन्यात सूर्यकुमारने मुंबईसाठी विजयी षटकार ठोकत त्याचे शतक पूर्ण केले. सूर्यकुमारचे हे आयपीएलमधील दुसरे शतक ठरले. ही दोन्ही शतके त्याने मुंबई इंडियन्ससाठी झळकावले आहेत. तसेच त्याने टी20 क्रिकेटमधील सहावे शतक आहे.

सूर्यकुमारने या सामन्यात 51 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह 102 धावांची नाबाद खेळी केली. तसेच तिलकने 32 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान, यामुळे अनेक विक्रम या सामन्यात झाले आहेत. याच विक्रमांवर एक नजर टाकू.

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना चौथ्या किंवा त्याखालील विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी

 • 144 धावा - गुरकिरत सिंग - शिमरॉयन हेटमायर (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बेंगळुरू, 2019)

 • नाबाद 143 धावा - सूर्यकुमार यादव - तिलक वर्मा (मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई, 2024)

 • 131 धावा - एबी डिविलियर्स - ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, मोहाली, 2012)

 • नाबाद 130 धावा - डेव्हिड मिलर - आर सतिश (पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मोहाली, 2013)

Suryakumar Yadav - Tilak Varma | Mumbai Indians
Matheesha Pathirana: 'गुडबाय...!' CSK चा स्टार गोलंदाज 17 व्या हंगामातून बाहेर; भावुक पोस्ट करत मानले आभार

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय

 • 9 शतके - विराट कोहली

 • 8 शतके - रोहित शर्मा

 • 6 शतके - ऋतुराज गायकवाड

 • 6 शतके - केएल राहुल

 • 6 शतके - सूर्यकुमार यादव

टी20 क्रिकेटमध्ये चौथ्या किंवा त्याखाली क्रमांकावर सर्वाधिक शतके

 • 5 शतके - ग्लेन मॅक्सवेल

 • 4 शतके - डेव्हिड मिलर

 • 4 शतके - सूर्यकुमार यादव

 • 3 शतके - दसून शनका

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक आयपीएल शतके

 • 2 शतके - रोहित शर्मा

 • 2 शतके - सूर्यकुमार यादव

 • 1 शतक - सचिन तेंडुलकर

 • 1 शतक - सनथ जयसूर्या

 • 1 शतक - लेंडल सिमन्स

 • 1 शतक - कॅमेरॉन ग्रीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com