What are Mumbai Indians' chances of reaching Qualifier 1? मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या शेवटच्या साखळी सान्यात पंजाब किंग्सविरुद्ध आज मैदानावर उतरणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता आणि २०१३ नंतर ते इथे प्रथमच जिंकले होते. आता आज त्यांना पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या पर्वात उल्लेखनीय पुनरागमन केले आहे. पहिल्या पाच पैकी ४ सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर मुंबईने दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ८ पैकी ७ सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत धडक मारली. आता त्यांना थेट क्वालिफायर १ मध्ये जाण्याची संधी आहे.