Mitchell Starc RCB vs KKR : एका चेंडूमागं मोजले 7.3 लाख तरी विकेटची पाटी मात्र कोरी... स्टार्कने हंगामाच्या सुरूवातीलाच दिलं टेन्शन

Mitchell Starc
Mitchell Starcesakal

Mitchell Starc Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर आयपीएल 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली होती. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रूपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. त्यामुळे तो यंदाच्या हंगामात केकेआरकडून कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते.

Mitchell Starc
IPL 2024 RCB vs KKR Live Score : आरसीबीसाठी पुन्हा विराट आला धावून, 83 धावांची खेळी करत संघाला पोहचवले 182 धावांपर्यंत

मात्र केकेआरचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. एक होम ग्राऊंड इडन गार्डन आणि आज दुसरा सामना आरसीबीसोबत चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या दोन्ही सामन्यात मिचेल स्टार्कला एकही विकेट घेता आलेली नाही. कॅलक्युलेशन करायचं झालंच तर स्टार्कने टाकलेला एक चेंडू हा 7.3 लाखाला पडत आहे. या गणिताने आतापर्यंत 350 लाख रूपये केकेआरने खर्च केलेत तरी स्टार्कला अजून एकही विकेट मिळवता आलेली नाही.

केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात मिचेल स्टार्क आणि विराट कोहली यांची जुगलबंदी पहायला मिळेल असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र मिचेल स्टार्क अजून काही फॉर्ममध्ये दिसलेला नाही. सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्कने 53 धावांची उधळण केली होती. आरसीबीविरूद्धच्या सामन्यात देखील या वर्ल्ड क्लास गोलंदाजाने 47 धावा दिल्या आहेत. दोन्ही सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आलेली नाही.

Mitchell Starc
IPL 2024 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ...? आयपीएल 2024 मधील सर्वात प्रसिद्ध संघाच्या यादीत मुंबईची झाली घसरण

चिन्नास्वामी स्टेडियमवर स्टार्कचा पेसच त्याचा दुष्मन झाला आहे. विराट कोहली अन् दिनेश कार्तिकने स्टार्कच्या या वेगाचा वापर करून उत्तुंग असे षटकार मारले. स्टार्कच्या गुणवत्तेबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र तो कधी फॉर्ममध्ये येणार हे काळच सांगेल.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com