Video: शामीनं आणली लखनौवर शामत; पाहा फायरी स्पेल

Mohammed Shami firey Spell against Lucknow Super Giant video gone viral aas86
Mohammed Shami firey Spell against Lucknow Super Giant video gone viral aas86

मुंबई: आयपीएलचे दोन नवखे संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giant) यांच्यात लढतीत गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून नवीन चेंडू टाकणाऱ्या मोहम्मद शामीने (Mohammed Shami) पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलला बाद करत मोठा धक्का दिला.

मोहम्मद शामीने नवीन चेंडूवर लखनौ सुपर जायंटची त्रेधा तिरपट उडवून दिली. पहिल्याच चेंडूवर राहुलला बाद केल्यानंतर शामीने तिसऱ्या षटकात लखनौ सुपर जायंटला अजून एक मोठा धक्का दिला. त्याने क्विंटन डिकॉकचा 7 धावांवर त्रिफळा उडवून देत लखनौची स्टार ओपनिंग जोडी अवघ्या 13 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडली. त्यानंतर मोहम्मद शामीने लखनौ चा अजून एक स्टार 'जमीनदोस्त' केला. त्याने मनिष पांडेचा देखील त्रिफळा उडवत लखनौची अवस्था 4 बाद 29 अशी केली.

Mohammed Shami firey Spell against Lucknow Super Giant video gone viral aas86
VIDEO : सहा वर्षांत पहिल्यांदाच KL राहुलवर आली Golden Duck ची वेळ

मोहम्मद शामीने लखनौची टॉप ऑर्डर उडवल्यानतंर दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करत लखनौला 150 चा टप्पा पार करून दिला. दीपक हुड्डाने 41 चेंडूत 55 धावा केल्या तर आयुष बदोनीने 41 चेंडूत बदोनी 54 धावांची खेळी केली. तर कृणाल पांड्याने 13 चेंडूत नाबाद 21 धावा करत लखनौला 158 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com