VIDEO : सहा वर्षांत पहिल्यांदाच KL राहुलवर आली Golden Duck ची वेळ IPL 2022 | Gujarat Titans vs Lucknow Super Giants | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Shami Sends KL Rahul golden duck

VIDEO : सहा वर्षांत पहिल्यांदाच KL राहुलवर आली Golden Duck ची वेळ

आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन नव्या संघांनी एकमेकांविरोधातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात केलीये. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात (Lucknow Super Giants) संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला खातेही उघडता आले नाही. मोहम्मद शमीनं (Mohammad Shami ) पहिल्याच चेंडूवर त्याला विकेटमागे झेलबाद केले. सामन्यातील पहिला चेंडू खेळून काढण्याचा लाकेश राहुलचा प्रयत्न फसला.

त्याची बॅट एका बाजूनं पॅडला लागली तरी बॅटच्या दुसऱ्या बाजूची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावला. मोहम्मद शमीनं जोरदार अपील केली. पण मैदानातील पंचानी त्याला हवा तसा रिप्लाय दिला नाही. शेवटी गुजरात टायटन्सच्या कर्णधार हार्दिक पांड्यानं रिव्ह्यू घेतला. आणि तो निर्णय लोकेश राहुलच्या विरोधात गेला. त्याला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता धरावा लागला. सहा वर्षानंतर 56 डाव खेळल्यानंतर लोकेश राहुलवर पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होण्याची वेळ आलीये.

हेही वाचा: Video: भावानेच काढला भावाचा काटा; पांड्या बंधूत कृणाल पडला भारी

नेमक काय झालं

मोहम्मद शमी स्पेलची सुरुवात कमालीची केली. त्याने पहिल्याच चेंडूवर जबरदस्त आउट स्विंगवर राहुलला चकवा दिला. बॉल आणि बॅटचा संपर्क झाल्याचा शमीला पूर्ण आत्मविश्वास होता. पण मैदानातील पंचांनी नकार दिला. हार्दिकने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये अल्ट्रा एजवर चेंडू बॅटची कडा घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले. राहुल बाद झाल्यानंतर पहिल्यांदाच संघाची कॅप्टन्सी करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. या सामन्यात शमीनं दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकसह मनीष पांडेला बोल्ड करुन आपल्या गोलंदाजीतील भेदक मारा दाखवून दिला. डी कॉक अवघ्या 7 धावांची भर घालून परतला. लखनऊच्या फलंदाजांनी शमीसमोर अक्षरश: गुडघे टेकले.

हेही वाचा: Video: शामीनं आणली लखनौवर शामत; पाहा फायरी स्पेल

पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शमीने त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. गुजरातच्या टीमने पहिल्या सामन्यात लॉकी फर्ग्युसन, मॅथ्यू वेड, डेविड मिलर आणि राशिद खान या परदेशी खेळाडूंना संधी दिल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Ipl 2022 Mohammad Shami Sends Kl Rahul Golden Duck First Ball With An Unplayable Delivery Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top