IPL 2023 : मोहम्मद सिराजने LIVE मॅचमध्ये सहकारी खेळाडूला केली शिवीगाळ, Video Viral

Mohammed Siraj abuses fellow teammate Mahipal Lomror after missed run out
Mohammed Siraj abuses fellow teammate Mahipal Lomror after missed run out

IPL 2023 Mohammed Siraj : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यातही सिराजने आपल्या धाकड गोलंदाजीने विरोधी संघातील सर्वात आक्रमक फलंदाज जोस बटलरला बाद केले. मात्र, या सामन्यादरम्यान एक घटना अशीही घडली जेव्हा सिराज त्याचा सहकारी महिपाल लोमरोरवर चांगलाच चिडला. सिराजने लोमरांनाही शिवीगाळ केली.

Mohammed Siraj abuses fellow teammate Mahipal Lomror after missed run out
Sachin Tendulkar Net Worth: सचिन, विराट आणि धोनीपेक्षाही आहे श्रीमंत? जाणून घ्या किती कोटींचा आहे मालक?

आरआरच्या डावाच्या 19व्या षटकात ही घटना घडली. ध्रुव जुरेल आणि रविचंद्रन अश्विन मैदानावर फलंदाजी करत होते. सिराजच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जुरेलने मिड-ऑनच्या दिशेने शॉट खेळला. येथे महिपाल लोमरोरने शानदार क्षेत्ररक्षण केले, चेंडू पकडला आणि तो नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी फेकला. यानंतर सिराजने चेंडू पकडला, पण तो विरोधी फलंदाजाला बाद करू शकला नाही.

Mohammed Siraj abuses fellow teammate Mahipal Lomror after missed run out
IPL 2023 : चाहत्यांना मोठा धक्का! रोहित अन् विराट टूर्नामेंट मध्येच सोडणार; मोठे कारण आले समोर

इकडे सिराज बॅट्समनला रनआउट करू न शकल्यामुळे रागाने लाल झाला आणि त्याने आपला सगळा राग महिपाल लोमरवर काढला. सिराजने सहकारी खेळाडूलाही शिवीगाळ केली, तरीही लोमररने सिराजच्या रागावर प्रतिक्रिया दिली नाही आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावर परतला. विशेष म्हणजे, सिराजला सामन्यानंतर आपली चूक लक्षात आली आणि त्याने आपल्या सहकारी खेळाडूची माफी मागितली.

आरसीबीने आरआरचा 7 धावांनी पराभव करून जिंकला होता. त्याचवेळी जोस बटलरची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा पर्पल कॅप जिंकली आहे. सिराजने मोसमात आतापर्यंत 7 सामन्यात एकूण 13 विकेट घेतल्या आहेत. आरसीबीला पुढील हंगामात त्यांच्या स्टार गोलंदाजाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com