IPL 2024 : 'कोण जिंकलं काय फरक पडतोय मी इथं फक्त...' धोनीच्या तुफान खेळीनंतर जुने ट्विट व्हायरल

MS Dhoni IPL 2024 News : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी दमदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपल्या स्फोटक खेळीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
MS Dhoni IPL 2024 News Marathi
MS Dhoni IPL 2024 News Marathisakal

MS Dhoni IPL 2024 News : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी दमदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपल्या स्फोटक खेळीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. पण आयपीएलच्या तेराव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा 20 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 191 धावांचे लक्ष्य ठेवले, त्याला प्रत्युत्तरात चेन्नईला 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. या हंगामातील चेन्नईचा हा पहिला पराभव आहे तर दिल्लीला पहिला विजय मिळाला आहे.

MS Dhoni IPL 2024 News Marathi
IPL 2024 : बीसीसीआयनं आयपीएल संघमालकांसोबत बोलावली अचानक बैठक; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

चेन्नईच्या पराभवानंतरही चाहत्यांमध्ये आनंदाची लाट दिसत होती. याचे सर्वात मोठे कारण धोनी होता. आठव्या क्रमांकावर उतरून त्याने चाहत्यांचे मनोरंजन केले. या अनुभवी फलंदाजाने अवघ्या 16 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 231.25 होता. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

आता माहीचे 10 वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, "कोणता संघ जिंकला याने काही फरक पडत नाही, मी येथे मजा करायला आलो आहे." स्टार फिनिशरने 24 मार्च 2014 रोजी हे ट्विट केले होते. आणि धोनीने हे ट्विट 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर केले होते.

MS Dhoni IPL 2024 News Marathi
MS Dhoni: ऋतुराजला धोनीने का दिली CSK संघाची कॅप्टन्सी, रवी शास्त्री म्हणाले, 'त्याचा अखेरचा हंगाम...'

दिल्लीविरुद्ध 16 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी करताना धोनीनेही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा धोनी तिसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे सोडले, ज्याच्या नावावर 6962 धावा आहेत.

धोनीच्या झंझावाती खेळीमुळे त्याने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 7036 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि इंग्लंडच्या जोस बटलरनंतर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डी कॉकने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 8578 धावा केल्या आहेत तर बटलरने 7721 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com