भारताच्या वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ( Rohit Sharma Test Retirement) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी हा विजय त्यांचे मनोबल उंचावणारा नक्की ठरेल. या सामन्यानंतर CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी कर्णधार MS DHONI ची भेट घेतली आणि त्यानंतर कॅप्टन कूलच्या विधानाने निवृत्तीच्या चर्चेने आणखी जोर धरला...