

MS Dhoni
esakal
MS. Dhoni: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा ३७ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात चेपॉक मैदानावर खेळला जाणार आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा हा ८ वा सामना आहे. आतापर्यंत त्यांनी ७ सामने खेळले असून ३ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ४ सामने गमावले आहेत. ६ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मोठा विजय मिळवत आपला नेट रनरेटही सुधारला आहे.