
MS Dhoni on IPL 2025: ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई संघाचे नेतृत्व आहे. त्यामुळे पडद्यामागून निर्णय घेत रहाण्याची मला आवश्यकता नाही. आयपीएलमध्ये आपला ठसा कायम रहावा म्हणून नवनवे फटके कसे मारता येतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे सुपरस्टार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.
यंदाच्या या आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यानंतर जिओहॉस्टरशी बोलताना धोनीने विविध विषयांवर भाष्य केले.