MS DHONI DREAM TEAM INDIAN CRICKETERS LISTesakal
IPL
ना विराट, ना युवराज! MS DHONI च्या ड्रिम टीममध्ये भारताच्या तीन दिग्गजांची नावं; माही म्हणाला, त्यांचा खेळ पाहणे म्हणजे सौभाग्यच...
MS Dhoni Picks His Dream Team: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अलीकडेच आपली ड्रिम टीम निवडली आणि त्यात त्याने तीन भारतीय फलंदाजांना निवडले. विशेष बाब म्हणजे त्याच्या या ड्रीम टीममध्ये विराट कोहली आणि युवराज सिंगसारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान नाही.
MS Dhoni Names Sachin, Sehwag, Ganguly in Dream Team महेंद्रसिंग धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दित अनेक स्टार खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळाली आणि नंतर त्याच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गजही खेळले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, झहीर खान, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, युवराज सिंग यांच्यासारख्या अनेकांसोबत धोनी खेळला आणि त्यांचे नेतृत्वही केले.