
Ruturaj Gaikwad Speaks on MS Dhoni IPL Future: चेन्नई सुपर किंग्ज संघ इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स विरूद्ध भिडणार आहे. सीएसकेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच चेपॉकवर हा सामना रंगणार आहे. पण प्रत्येक हंगामातील सिएसकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी एक चर्चा नेहमीच होते की माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्ती घेणार का? यावरून अने तर्क लावले जातात. पण यावेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनेच धोनीच्या आयपीएलमधील भविष्यावर भाष्य केलं आहे.