esakal | "तरच पुढच्या IPL मध्ये दिसेल धोनी" | MS Dhoni Retirement
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni-Dale-Steyn

डेल स्टेनचं महत्त्वाचं वक्तव्य

"तरच पुढच्या IPL मध्ये दिसेल धोनी"

sakal_logo
By
विराज भागवत

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. उपांत्य फेरीत भारताचा न्यूझीलंडने पराभव केला. या पराभवानंतर वर्षभर धोनीला आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२० ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने त्यानंतर IPL 2020 मध्ये खूपच सुमार कामगिरी केली. पण IPL 2021 मध्ये त्यांचे अद्याप दोन सामने शिल्लक असतानाच त्यांचा संघ प्ले ऑफ्सध्ये पोहोचला आहे. आता यंदाच्या IPL नंतर धोनी निवृत्त होणार की पुढे खेळणार याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. पण डेल स्टेनने मात्र धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत मोठं वक्तव्य केलं.

हेही वाचा: IPL 2021: जड्डूचा सिक्सर अन् ऋतूराजची तलवारबाजी; व्हिडिओ व्हायरल

CSK-MSD

CSK-MSD

हेही वाचा: IPL 2021: दिल्लीनं तख्त राखलं! मुंबई इंडियन्सवर टांगती तलवार

"महेंद्रसिंह धोनी हा चेन्नईचा मैदानावरील बॉस आहे. जेव्हा तुम्ही CSKचा विचार करता तेव्हा तुमच्या समोर पहिला चेहरा धोनीचा येतो. धोनीच्या संघाचा एक चांगला मुद्दा असा की त्यांच्या संघाचे अजूनही दोन सामने शिल्लक आहेत. पण त्यांनी आधीच प्ले ऑफ्सची फेरी गाठली आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांचा संघ जरी पुढच्या फेरीत पोहोचला असला तरी धोनीला मात्र फारशी कमाल दाखवता आलेली नाही. अशा परिस्थितीत मला असं वाटतं की जर धोनीचा संघ फायनलमध्ये पोहोचला आणि धोनीने विजयी धावा काढल्या तर धोनी नक्कीच IPL 2022मध्ये चेन्नईकडून खेळताना दिसेल", असा विश्वास डेल स्टेनने व्यक्त केला.

loading image
go to top