esakal | जड्डूचा सिक्सर अन् ऋतूराजची तलवारबाजी; व्हिडिओ व्हायरल I Ravindra Jadeja
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja and Ruturaj Gaikwad

IPL 2021: जड्डूचा सिक्सर अन् ऋतूराजची तलवारबाजी; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 14 व्या हंगामातील 47 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सामन्यात धावांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं 7 विकेट राखून विजय नोंदवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) ची फटकेबाजी पाहायला मिळाले. याला राजस्थानकडून शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या सामन्यात नाबाद 101 धावांची खेळी केली. आयपीएलच्या कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक आहे. दुसऱ्या बाजूला जाडेजाने 15 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली. आपल्या छोट्याखानी धमाकेदार खेळीत जाडेजाने एक जबरदस्त षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूवर त्याने लेग साईडला उत्तुंग षटका खेचला. त्याचा हा फटका पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

हेही वाचा: IPL Points Table : राजस्थानच्या विजयानं प्लेऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 20 व्या षटकात संजू सॅमसनने बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिझुर रहमानच्या हाती चेंडू सोपवला. मुस्तफिझुरच्या चेंडुवर स्विप शॉटवर जाडेजाने मारलेला षटकार पाहून ऋतूराजने खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. जाडेजा अर्धशतकी खेळी किंवा शतकी खेळीनंतर ज्याप्रमाणे तलवारबाजी करतो ती स्टाईल ऋतूराजने कॉपी केली. जाडेजाने मारलेल्या षटकाराचे नॉन स्ट्राइकवर असलेल्या ऋतूराजने तलवारबाजी स्टाईलमध्ये आनंद व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

loading image
go to top