esakal | पॉवर प्लेमध्येच MI प्ले ऑफमधून आउट! KKR चा मार्ग मोकळा | KKR vs RCB
sakal

बोलून बातमी शोधा

पॉवर प्लेमध्येच MI प्ले ऑफमधून आउट! KKR चा मार्ग मोकळा

पॉवर प्लेमध्येच MI प्ले ऑफमधून आउट! KKR चा मार्ग मोकळा

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL play offs Race : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 235 धावा करुनही मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर नेट रनरेटच्या जोरावर क्वालिफाय होण्यासाठी मुंबई इंडियन्सला हैदराबादच्या संघाला 64 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखायचे होते. पॉवर प्लेमध्येच सनरायझर्सने हा टप्पा पार केला. त्यामुळे मॅचचा निकाल लागण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा प्ले ऑफमधील मार्ग मोकळा झाला.

आयपीएलच्या 14 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्ले ऑफमध्ये पोहचेल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण युएईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी दमदार कामगिरी करत सर्वांनाच आश्रर्याचा धक्का दिला. 14 गुण मिळवून ते चौथ्या स्थानावर विराजमान झाले होते. मुंबई इंडियन्सने हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकला तरी त्यांच्या खात्यात 14 गुण जमा होतील. पण नेट रनरेट उत्तम असल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्यावर भारी पडले.

हेही वाचा: MI vs SRH मॅच फिक्स! अंबानीही ट्रेंडमध्ये

प्ले ऑफमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला दिल्ली कॅपिटल्स आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात येईल. दुबईच्या मैदानात रविवारी रंगणाऱ्या या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातून फायनलमध्ये एन्ट्री मारण्याची संधी असेल.

हेही वाचा: Video: पोलार्डचा 'रॉकेट-शॉट' रॉयच्या हातात जाणार इतक्यात...

एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना सोमवारी शारजाच्या मैदानात खेळवण्यात येईल. यातील विजेता पहिल्या क्लालिफायरमधील पराभूत संघासोबत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळताना दिसेल. यातील विजेता 15 आक्टोबरला फायनलमध्ये खेळेल.

loading image
go to top