MI vs DC : 'सचिनचा मुलगा असणे गुन्हा आहे काय?' | Mumbai Indians Benched Arjun Tendulkar Once Again | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians Benched Arjun Tendulkar Once Again

MI vs DC : 'सचिनचा मुलगा असणे गुन्हा आहे काय?'

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजची 69 वी मॅच आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्या होत आहे. या सामन्यात मुंबई सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी देणार की नाही अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. मुंबईचा यंदाच्या हंगामातील हा शेवटचा सामना असल्याने आता तरी अर्जुन तेंडुलकरला आयपीएल पदार्पण (IPL Debut) करण्याची संधी मिळेल असे वाटत होते. मात्र मुंबईने अर्जुन तेंडुलकरला बेंचवरच बसवणे पसंत केले आहे.

हेही वाचा: मुंबई इंडियन्सची जर्सी घालून कार्तिकने आठवण करून दिली की...

दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ज्यावेळी नाणेफेकीसाठी आला त्यावेळी त्याने संघात दोन बदल असल्याचे जाहीर केले. यात अर्जुन तेंडुलकरचे नाव घोषित होईल अशी आस लागली होती. मात्र मुंबईने डेवाल्ड ब्रेविस आणि शैकीन यांना संघात स्थान दिले. मात्र अर्जुन तेंडुलकरकडे कानाडोळा केला. मुंबईच्या या निर्णयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. तरूण तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करून मुंबईच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यांनी 'अर्जुन तेंडुलकरला पुन्हा अंतिम 11 च्या संघात स्थान मिळालेले नाही. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा असणे गुन्हा आहे का? मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन सोडून सर्वांना संधी मिळत आहे. जर त्याला खेळवायचे नव्हचे तर मग संघात घेतलेच कशाला?' असा प्रश्न विचारला.

हेही वाचा: एमएस धोनीला भेटण्यासाठी चाहता लाईव्ह मॅचमध्ये घुसला पाहा VIDEO

अर्जुन तेंडुलकर ज्यावेळी यंदाच्या मेगा लिलावात उतरला होता त्यावेळी त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती. तो यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात होता. मेगा लिलावात त्याच्यावर मुंबई इंडियन्सनेच पहिल्यांदा बोली लावली. मात्र गुजरात टायटन्सने 25 लाखाची बोली लावत सर्वांना धक्का दिला. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाखाला आपल्या गोटात सामिल करून घेतले. जेव्हापासून मुंबई प्ले ऑफमधून बाहेर गेली आहे तेव्हापासून अर्जुन तेंडुलकरला खेळवा अशी मागणी चाहते करत आहेत.

Web Title: Mumbai Indians Benched Arjun Tendulkar Once Again Fan Reaction On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top