IPL 2024 : KKR विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या संतापला, या खेळाडूंना धरले जबाबदार

Mumbai Indians Captain Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला.
mumbai indians captain hardik pandya
mumbai indians captain hardik pandyaskal

Mumbai Indians Captain Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. या विजयासह कोलकाता प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. या हंगामात जेव्हा हे संघ पहिल्यांदा आमनेसामने आले तेव्हा कोलकाताने मुंबईचा 24 धावांनी पराभव केला होता.

mumbai indians captain hardik pandya
CSK vs RR : थाला चेन्नईमध्ये शेवटचा IPL सामना खेळणार? गतविजेत्या CSK चा लौकिक पणास; राजस्थानसमोर लागणार कस

मुंबई इंडियन्सचा 13 सामन्यांमधला हा नववा पराभव आहे आणि आता 17 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेचा शेवट करेल. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजांवर चांगलाच संतापला आहे. हार्दिक पांड्या म्हणाला, 'बॅटिंग युनिट म्हणून आमचा पाया मजबूत होता, पण त्यानंतर आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही.

mumbai indians captain hardik pandya
Team India T20 WC 24 : कर्णधार-उपकर्णधार फ्लॉप, टीम इंडिया चॅम्पियन कशी होणार?

हार्दिक पांड्या म्हणाला, विकेट थोडी अवघड होती त्यामुळे वेग खूप महत्त्वाचा होता. मला वाटते की परिस्थिती लक्षात घेता हा स्कोअर बरोबर होता, पण आम्ही आवश्यक धावगतीनुसार फलंदाजी करायला हवी होती. सीमारेषेवरून येणारा प्रत्येक चेंडू ओला होऊ येत होता. मला वाटले की गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 17 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढच्या सामन्याबद्दल म्हणाला, 'काही नाही, फक्त जा आणि जितका आनंद घेता येईल तितका आनंद घ्या आणि चांगले क्रिकेट खेळा, हे माझे सुरुवातीपासूनचे ध्येय आहे. या हंगामात आम्ही चांगली क्रिकेट खेळलो नाही असे मला वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com