Complete IPL 2025 Prize Distribution Breakdown मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून स्पर्धेतून एक्झिट घेतली. पंजाब किंग्सने अगदी सहज मुंबई इंडियन्सला पराभूत केले. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करणारा मुंबईचा संघ क्वालिफायर २ पर्यंत पोहोचेल, याचा विचारही कुणी केला नव्हता. पण, रोहित शर्माला सूर गवसला अन् त्याच्यासोबत मुंबईच्या विजयाची मालिका सुरू झाली. सूर्यकुमार यादव, रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, नमन धीर यांनी चांगला जोर दाखवला. पण, क्वालिफायर २ मध्ये पंजाबविरुद्ध ते कमी पडले. तरीही ते स्पर्धेतून कोट्यवधी कमावून गेले.