
Mumbai Indians Team Analysis IPL 2025: मुंबई इंडियन्स फ्रॅंचायझीने यंदाच्या आयपीएल लिलावात आणि लिलावापूर्वी चांगला डाव टाकला. लिलावापूर्वी पाच तगडे खेळाडू संघात कायम ठेवले आणि लिलावामध्ये मागच्या हंगामात जाणवलेली कमी भरून काढली. मागील हंगामात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पदरी अपयश आले. पण यावेळी मुंबईने असा संघ निवडला की यंदा सगळीकडे मुंबईचाच बोलबाला आहे. सर्वच क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम मुंबई गाजवेल असा अंदाज लावला जात आहे. पण मुंबईने यावेळी संघाची बांधणी नेमकी केलीय कशी ? जाणून घेऊयात.