मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर | Suryakumar Yadav Out Of TATA IPL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav Out Of TATA IPL

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर

मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी सुमार होत असताना फॉर्मात असलेला एकमेव फलंदाज सूर्यकुमार यादवचीही साथ आता त्यांना मिळणार नाही. दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताच्या मनगटाचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीला सल्ला देण्यात आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती, जेव्हा त्याने 11 चेंडूत 13 धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईने गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव केला.(Suryakumar Yadav Out Of TATA IPL)

हेही वाचा: "माझा नवरोबानी आग लावली आग..."; बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नीचे ट्विट व्हायरल

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. या हंगामात त्याने 8 सामन्यात 303 धावा केल्या आहे, ज्यामध्ये तीन अर्धशतकांसह त्याची सरासरी 43.29 आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादव खराब फिटनेसमुळे काही सामन्यांनंतरच मुंबई इंडियन्सच्या संघाशी जोडला गेला होता. टीम इंडियाकडून खेळताना तो जखमी झाला होता, त्यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे लागले. एनसीएकडून मंजुरी मिळाल्यानंतरच सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये खेळू शकला. आता सूर्यकुमार यादव किती दिवस तंदुरुस्त राहणार हे पाहावे लागेल, कारण आयपीएल संपल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकाही खेळायची आहे.

Web Title: Mumbai Indians Suryakumar Yadav Out Of Tata Ipl 2022 Due To Injury

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top