Mumbai Indians Viral Video: गुलाबी साडी अन् लाली... सोनावणे वहिनींचा MI सोबत धुमाकूळ, ईशान किशनही लाजला

Mumbai Indians Viral Video: मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंचा 'गुलाबी साडी' गाण्यावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mumbai Indians Viral Video
Mumbai Indians Viral VideoInstagram/mumbaiindians

Mumbai Indians Viral Video: इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम शुक्रवारपासून (22 मार्च) सुरु होणार आहे. अशाच सर्व संघांची तयारी सुरू झाली असून खेळाडू सराव सत्रांमध्ये घाम गाळत आहेत. सरावादरम्यान अनेक फोटो आणि व्हिडिओही संघ आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत आहेत.

दरम्यान, पाचवेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स देखील सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सबरोबरचे व्हिडिओ कोलॅबरेशनमध्ये शेअर करत आहेत.

Mumbai Indians Viral Video
IPL सुरु होण्याआधीच राजस्थानला धक्का! स्टार फिरकीपटू संपूर्ण हंगामातून बाहेर, मुंबईच्या खेळाडूला संधी

नुकताच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करन सोनावणे याने मुंबई इंडियन्समधील खेळाडूंबरोबर केलेला एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये करन सोनावणे 'सोनावणे वहिनी'ही भूमिका निभावताना दिसत आहे, तर इशान किशन त्याला पाहून लाजतानाही दिसत आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सोनावणे वहिनी क्रिकेट खेळणार काय? असं विचारतानाही दिसत आहे.

त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू पीयुष चावला, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस असे खेळाडूही दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'गुलाबी साडी आणि लाली लाले लाल' हे गाणे वाजत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mumbai Indians Viral Video
IPL 2024: रचिन, ग्रीन ते धोनी; चेन्नई - बेंगळुरू सामन्यात 'या' 5 खेळाडूंच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

मुंबई इंडियन्स खेळणार पांड्याच्या नेतृत्वात

दरम्यान, यंदा मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. हार्दिक 2015 ते 2021 दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. पण 2022 आयपीएलपूर्वी हार्दिकला मुंबईने करारमुक्त केले. त्यामुळे गुजरात टायटन्सने त्याला संघात घेत नेतृत्वाचीही धुरा दिली होती.

त्याने 2022 आणि 2023 मध्ये गुजरातचे नेतृत्व करताना अंतिम सामनाही गाठला. 2022 मध्ये त्याच्या नेतृत्वात गुजरातने विजेतेपदही पटकावले, तर 2023 मध्ये गुजरात संघ उपविजेता ठरला होता.

परंतु 2024 आयपीएल लिलावानंतर गुजरातने हार्दिकला मुंबईकडे ट्रेड करत सर्वांना धक्का दिला. मुंबईने हार्दिकला पुन्हा संघात तर घेतलेच, पण त्याच्याकडे कर्णधारपदाची धूराही दिली. त्यामुळे यावेळी हार्दिक मुंबईचे नेतृत्व करताना दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com