MI vs GT Playing 11 : गुजरातविरूद्ध फक्त बॅटिंगवर कसा जिंकणार सामना... रोहितला अर्जुन तेंडुलकरशिवाय पर्यायच नाही?

MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar
MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar esakal

MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar : आयपीएलच्या 16 व्या हंगामाची साखळी फेरी ही आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. इथे सर्व संघांना आपले अखेरचे काही सामने जिंकल्याशिवाय गत्यंतर नाही. रोज पॉईंट टेबलमध्ये मोठे उलटफेर होत आहेत. आज आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल असलेली गुजरात टायटन्स चौथ्या स्थानावर घसरलेल्या मुंबई इंडियन्सला त्याच्याच होम ग्राऊंडवर आव्हान देणार आहे.

MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar
Wrestlers Protest : बृजभूषण प्रकरणामुळे बीसीसीआयला देखील आली NHRC ची नोटीस

मुंबई इंडियन्सने जवळपास 200 चे टार्गेट तीनवेळा चेस केले आहे. मात्र त्यांचा कर्णधार रोहित शर्माला गेल्या पाच सामन्यात दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही. अशा परिस्थितीत तगडी गोलंदाजी असलेल्या गुजरात टायटन्सला नमवायचं असेल तर त्यांना फक्त फलंदाजीच्या जीवावर राहुन उपयोग होणार नाही. मुंबईची गोलंदाजी ही यंदाच्या हंगामात फार कचखाऊ ठरली आहे. त्यामुळे ते प्रतिस्पर्धी संघाला भरपूर धावा देतात. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आजच्या सामन्यासाठी आपल्या संघात गोलंदाजी विभागात काही बदल करू शकतो.

पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी खुद्द कर्णधार रोहित शर्मा हा डोकेदुखी ठरत आहे. त्याचा सलामीचा पार्टनर इशान किशन चांगली फलंदाजी करतोय मात्र रोहितकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळत नाहीये. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर रोहित शर्माला आता तरी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सूर्यकुमार यादव हा पुन्हा एकदा आपल्या लयीत आला आहे. मुंबईसाठी ही एक जमेची बाजू आहे. कॅमरून ग्रीन, टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनीही वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. नेहाल वधेरा हा एक युवा खेळाडू मुंबईला यंदाच्या हंगामात सापडला आहे. त्याने दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar
Suyash Sharma Yashasvi Jaiswal : यशस्वीचं शतक पूर्ण होऊ नये म्हणून सुयशचा कुटील डाव, माजी खेळाडूने उपटले कान

मात्र मुंबईसाठी मोठा समस्या ही गोलंदाजीत आहे. MI च्या गोलंदाजांनी सलग चार सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला 200 च्यावर धावा करू दिल्या. मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व हे जेसन बेहरनडॉर्फ करतोय. आता मुंबईकडे जोफ्रा आर्चर देखील नाहीये. बेहरनडॉर्फने आरसीबीविरूद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्याच्या जोडीला चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज मुंबईला सापडत नाहीये. त्यामुळे कदाचित आजच्या सामन्यात रोहित शर्माला अर्जुन तेंडुलकरला खेळवण्यावाचून पर्याय उरणार नाही. अर्जुनसोबतच रिले मेरेडिथ देखील ख्रिस जॉर्डनची जागा घेऊ शकतो.

मुंबईची गुजरातविरूद्धच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वधेरा, तिलक वर्मा, कॅमरून ग्रीन, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com