Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi News मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या आजच्या सामन्यात नाट्यमय वळण होते, टशन होती, भांडण होते, गंमतही होती.. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये हा असा पहिलाच सामना असेल की त्याचा अंदाज बांधणे अनेकांना अवघड झाले होते. मुंबईने २०५ धावा उभारल्यानंतर मैदानावर आलेल्या दिल्लीला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. आता मुंबई संधी सोडत नाही असे वाटत असताना करुण नायर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला अन् त्याने जो काय धुमाकूळ घातला तो नेत्रदिपक होता.