Wankhede under rain clouds ahead of MI vs DC
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस पडला. पुढील ४ दिवस महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यावरही पावसाचं सावट असण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी थेट मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत आहे. त्यामुळेच मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर होणारा MI vs DC सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.