...तर उमरानचा वेग कमी होणार? भारताच्या माजी गोलंदाजाने केली चिंता व्यक्त

भारताचा माजी वेगवान गोलंदाजला उमरान मलिकच्या दुखापतीची वाटत आहे भीती
munaf patel on umran malik
munaf patel on umran malik sakal

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि गोलंदाज उमरान मलिक यांची चर्चा जोरात आहे. याचं कारण म्हणजे या हंगामात दोघेही दमदार कामगिरी करत आहे. IPL 2022 च्या गुणतालिकेत गुजरात पहिल्या स्थानावर आहे. तर उमरानने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करत आला आहे. 8 सामन्यात त्याने 15 विकेट घेतले आहेत. युझवेंद्र चहलसह या हंगामात एका सामन्यात 5 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. 21 वर्षीय उमरानचा हा दुसरा आयपीएल हंगाम आहे. त्याने एका वर्षात आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा केली आहे. आता सध्या तो वेगवान गोलंदाजीही प्रभावीपणे करत आहे. त्यामुळे भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलला त्याच्या दुखापतीची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयला उमरानकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

मुनाफ पटेल एका इंग्रजी माध्यमासोबत बोलताना म्हणाला, उमरानला गोलंदाजी करताना पाहून मलाही गोलंदाजी करावी वाटते. अशा मुलांना आयपीएलमध्ये संधी मिळणे हे खूप चागलं आहे. आपल्या खेळाडूंना जगातील सर्वात मोठ्या लीगचा फायदा होत आहे. विशेषत जे खेळाडू छोट्या ठिकाणाहून येतात. नाहीतर उमरान आता कुठे खेळत असता कुणाला माहित नसत? आता तो आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे मला त्याचा आनंद होत आहे.

munaf patel on umran malik
Video Viral: मॅक्सवेलच्या पार्टीत कोहली झाला 'पुष्पा'

मुनाफ पटलेने बीसीसीआयला सल्ला दिला की वेगवान गोलंदाजांनी खेळलेल्या सामन्यांची संख्या निश्चित केली पाहिजे. झहीर खान सुरुवातीला टीम इंडियात आला तेव्हा तो 145 प्रति वेगाने गोलंदाजी करत होता. इशांत शर्मा, मी त्याच वेगाने गोलंदाजी करत होतो. सध्या उमेश यादव, नवदीप सैनी यांचाही वेग चांगला आहे. अशा स्थितीत अशी व्यवस्था असायला हवी, ज्याद्वारे वेगवान गोलंदाज एका वर्षात किती सामने खेळणार हे निश्चित केले जाईल. आता अर्थातच फिजिओथेरपी आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, तरीही उमरानसारख्या गोलंदाजाची काळजी घ्यावी लागेल. जर उमरानचा वापर जास्त केला तर त्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. सध्या तो अप्रतिम गोलंदाजी करत आहे.

munaf patel on umran malik
वहिनीसाहेब आल्या, दिल्ली कॅपिटल्सचं नशीब घेऊन

मुनाफ पटेल यांनी उमराणला दिला मोठा सल्ला दिला आहे. स्टेनप्रमाणे उमरानने लाईन आणि लेन्थवर अधिक लक्ष केंद्रित केल तर उमराणला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजू शकतो. बाकी त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी थोडीशी तडजोड करावी लागेल. कारण भारतामध्ये वेगवान गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नसते. अशा स्थितीत उमरानने 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली तरी त्याच्यासाठी चांगले होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com