IPL 2024: RCB च्या गोलंदाजाबद्दल ऑन एअर मुरली कार्तिक असं म्हणाला तरी काय की उडाली मोठी खळबळ

Murali Kartik on Yash Dayal: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स संघातील आयपीएल सामन्यादरम्यान मुरली कार्तिकने ऑन एअर केलेल्या एक वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
Murali Karthik | RCB | IPL 2024
Murali Karthik | RCB | IPL 2024Sakal

RCB vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सोमवारी (26 मार्च) पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात बेंगळुरूने 4 विकेट्सने विजय मिळवला.

मात्र या सामन्यादम्यान समालोचन करताना माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने बोललेल्या एका वाक्याने खळबळ उडाली आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावरही जोरदार झाली.

Murali Karthik | RCB | IPL 2024
Virat Kohli: 'माझं नाव टी20 क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी जगभरात...', RCB च्या पहिल्या विजयानंतर विराट स्पष्टच बोलला

झाले असे की या सामन्यात बेंगळुरूने वेगवान गोलंदाज यश दयाललाही संधी दिली होती. त्यावरूनच कार्तिकने भाष्य केले होते. यश दयाल 2023 आयपीएल गुजरात टायटन्सकडून खेळला होता. पण 2024 आयपीएलपूर्वी गुजरातने त्याला करारमुक्त केल्याने तो लिलावात उतरला होता. लिलावात त्याला बेंगळुरूने 5 कोटी रुपयांना खरेदी केले.

खरंतर आयपीएल 2023 मध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या दयालविरुद्ध रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दयाल आणि रिंकू सिंग प्रकाशझोतात आले होते. दरम्यान, आता 2024 आयपीएलमध्ये दयाल बेंगळुरूकडून खेळत आहे.

बेंगळुरूने नाणेफेक जिंकल्यानंतर कार्तिक ऑन एअर म्हणाला, 'कोणासाठीचा तरी कचरा, कोणासाठी तरी खजिना ठरू शकतो.' त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक युजर्सने कार्तिकवर टीका केली आहे.

Murali Karthik | RCB | IPL 2024
RCB vs PBKS : विराट कोहलीने मोडला 'मिस्टर IPL'चा मोठा विक्रम अन् रचला इतिहास!

विनोदवीर आणि टेलिव्हिजन होस्ट दानिश सेत यानेही पोस्ट करत कार्तिकवर टीका करताना म्हटले, 'तू असं कसं म्हणून शकतो की कोणासाठीचा तरी कचरा, कोणासाठी तरी खजिना ठरू शकतो? तू ऑन एअर यश दयालला कचरा म्हणाला आहे? असं का म्हणजे?' याव्यतिरिक्तही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, दयालच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 4 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने पंजाब किंग्सचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला 23 धावांवर बाद झाला.

या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या आहेत. त्यानंतर 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com