KKR vs LSG : पूरन पुरून उरला! केकेआरने प्ले ऑफचे स्वप्न पाहणाऱ्या लखनौची हवा केली होती टाईट

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giantsesakal

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला कोलकाता नाईट रायडर्सने हवा टाईट केली होती. इडन गार्डनवर लखनौची अवस्था 5 बाद ना 73 अशी झाली होती. मात्र निकोलस पूरन लखनौसाठी धावून आला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या केकेआरने लखनौला 176 धावात रोखले.

केकेआरकडून वैभव अरोराने 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती, सुनिल नरेन या फिरकीपटूंनी देखील दमदार गोलंदाजी केली. केकेआरकडून निकोलस पूरनने 30 चेंडूत 58 धावांची झुंजार खेळी केली. पूरनने आयुष बदोनीच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली. बदोनीने 25 धावांचे योगदान दिले.

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants
Wrestlers Protest IPL DC vs CSK : धोनीची मॅच पाहण्यापासून बजरंग, विनेशला रोखले, आंदोलन कुस्तीपटू म्हणाले...

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौला हरशीत राणाने पहिला धक्का दिला. त्याने करण शर्माला 3 धावांवर बाद केले. यानंतर सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मंकड यांनी डाव सावरत पॉवर प्लेमध्ये लखनौचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र वैभव अरोराने ही जोडी फोडली. त्याने मंकडला 26 धावांवर बाद केले. पाठोपाठ मार्कस स्टॉयनिसलाही शुन्यावर माघारी धाडत लखनौची अवस्था 3 बाद 55 धावा अशी केली.

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants
DC vs CSK Score: डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज मात्र चेन्नईची प्ले ऑफमध्ये थाटात एन्ट्री

यानंतर आलेला कर्णधार क्रुणाल पांड्या आणि डिकॉकने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनिल नरेनने क्रुणाल पांड्याची झुंज 9 धावात संपवली. त्यानंतर वरूण चक्रवर्तीने डिकॉकला 28 धावांवर गारद केले. 11 व्या षटकात 73 धावांवर लखनौचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी डाव सावरत भागीदारी रचली.

निकोलसने आक्रमक फटकेबाजी केली तर बदोनीने एक बाजू टिकवून धरली होती. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी नरेनने फोडत बदोनीला 25 धावांवर बाद केले. दरम्यान, निकोलस पूरनने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

मात्र शेवटची काही षटके शिल्लक असताना शार्दुल ठाकूरने पूरनचा झंजावात रोखला. पूरनने 30 चेंडूत 58 धावा ठोकल्याने लखनौ 150 धावा पार करू शकला. अखेर केकेआरने लखनौला 20 षटकात 8 बाद 172 धावात रोखले.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com