

नितीश कुमार रेड्डी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ गाजवण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या या अष्टपैलू खेळाडूचा तंदुरुस्ती अहवाल शनिवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ( NCA) सादर केला. नितीश रेड्डी आयपीएल २०२५ खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे त्यांनी म्हटले. जानेवारीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेत झालेल्या दुखापतीनंतर रेड्डी पुनर्वसनासाठी NCA मध्ये दाखल झाला होता. आयपीएल २०२५ सुरू होण्यास आठवडा शिल्लक असताने त्याचे ताफ्यात दाखल होणे ही SRH साठी खूप मोठी गोष्ट आहे.