Delhi Capitals playoff chances after 1-point result against SRH
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघांना एकेक गुण दिल्याने SRH चे प्ले ऑफचे आव्हान संपुष्टात आले. IPL 2025 मधून चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यानंतर बाद होणारा SRH हा तिसरा संघ ठरला. DC ने पराभव टाळला असला तरी एका गुणाने त्यांचे पुढील समीकरण बिघडवले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे ११ सामन्यांत ६ विजय, ४ पराभव व १ ड्रॉ निकालामुळे १३ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत.