esakal | "कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता" | Kapil vs Imran
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil-Dev-Imran-Khan

तुम्हाला पटतंय का माजी क्रिकेटपटूचं मत

"कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता"

sakal_logo
By
विराज भागवत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता गेली अनेक वर्षे या दोन संघांमध्ये क्रिकेट मालिका खेळल्या जात नाही. ICCच्या स्पर्धांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी हे दोन संघ एकमेकांसमोर खेळत नाहीत. कोरोना काळात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने भरवले जावेत आणि त्याच्यातून मिळणारा निधी कोरोनाग्रस्तांसाठी वापरावा असा प्रस्ताव काही पाकिस्तानी क्रिकेटर्सने मांडला होता. पण त्यावर कोणी फारसे गांभीर्याने उत्तर दिले नाही. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर याने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. सध्याच नव्हे तर आधीपासूनच पाकिस्तानमधील क्रिकेटर्सच्या तोडीचे खेळाडू भारताला कधीच घडवता आले नाहीत, असं वक्तव्य त्याने केलं.

हेही वाचा: T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल गंभीरची भविष्यवाणी

"भारताचा क्रिकेट संघ चांगला आहे. त्यांच्याकडेदेखील काही चांगले खेळाडू आहेत. पण खेळाडूंच्या क्षमतेचा विचार केला तर भारतीय संघातील खेळाडू कधीही पाकिस्तानच्या तोडीस तोड नव्हते. पाकिस्तानच्या संघाकडे इम्रान खान होता, तर भारताकडे कपिल देव होता. हे दोघेही चांगले खेळाडू होते. पण तुलना करायची झाली तर इम्रान खान हा कपिल देवपेक्षा खूप भारी क्रिकेटर होता", असं मत माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने व्यक्त केले.

हेही वाचा: न्यूझीलंडनं पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली : अख्तर

Abdul-Razzak

Abdul-Razzak

पुढे तो म्हणाला, "पाकिस्तानच्या संघात वासिम अक्रम हा एक महान खेळाडू होऊन गेला. त्या तोडीचा एकही खेळाडू आतापर्यंत भारतीय क्रिकेटला घडवता आला नाही. पाकिस्तानकडे जावेद मियांदाद होता. त्यांच्याकडे सुनील गावसकर होते. त्यांच्यातदेखील कोणतीही तुलना होऊ शकत नाही. (जावेद मियांदाद गावसकरांपेक्षा खूप चांगला खेळाडू होता). पाकिस्तानकडे इंझमाम उल हक, मोहम्मद युसूफ, युनिस खान, शाहिद आफ्रिदी हे सारे खेळाडू होते. त्या तोडीचे भारताकडे केवळ राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग दोघेच होते. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटचा अभ्यास केल्यास पाकिस्तान क्रिकेटने भारतापेक्षा खूप चांगले खेळाडू घडवले. त्यामुळेच भारतीय संघ पाकिस्तानसमोर क्रिकेट खेळायला घाबरतो."

loading image
go to top