Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Pat Cummins SRH vs RR
Pat Cummins SRH vs RR Esakal

Pat Cummins SRH vs RR IPL 2024 : कोण म्हणतं टी 20 हा बॅटरचा गेम झालाय...? सनराईजर्स हैदराबादनं राजस्थानविरूद्धच्या दाखवून दिलं की डेथ ओव्हरमध्ये बॉलर देखील किंग होऊ शकतो फक्त तेढवा दर्जा तुमच्याकडं हवा!

हैदराबादनं यंदाच्या हंगामात एका बॅटरला कर्णधार न करत बॉलर पॅट कमिन्सच्या खांद्यावर संघाची धुरा दिली. कमिन्सही टी 20 क्रिकेटमध्ये अजून बॉलर रिलेव्हंट आहेत हे वेळोवेळी दाखवून दिलं. राजस्थान रॉयल्सच्या सामन्याविरूद्ध तर यावर त्यानं शिक्कामोर्तब केलं.

Pat Cummins SRH vs RR
Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

नाणेफेक जिंकून कमिन्स चेस करण्यापेक्षा टोटल डिफेंड करण्याचा निर्णय घेतला. राजस्थाननं पॉवर प्लेमध्ये हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना चांगलंच वेसन घालं होतं. 6 ओव्हरमध्ये फक्त 37 रन्स झालेली हैदराबाद 200 रन्स पार करेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र ट्रॅविस हेडच्या 58 रन्स करत हैदराबादचं रनरेट वाढवलं.

त्यानंतर नितीन रेड्डीनं 42 बॉलमध्ये 76 रन्स चोपत संघाला मोठी टोटल उभारण्यात मदत केली. क्लासेननं 19 बॉलमध्ये नाबाद 42 रन्स करत हैदराबादला 201 पर्यंत पोहचवलं.

Pat Cummins SRH vs RR
SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

यंदाच्या हंगामात 200 काय 250 रन्स देखील आरामात चेस झाल्यात. त्यामुळं राजस्थान सामन्यात बाजी मारणार असा अंदाज होता. मात्र भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच ओव्हरमध्ये बटलर अन् संजूला शुन्यावर माघारी धाडलं. राजस्थानच्या चाहत्यांच्या मनात धडकीच भरली.

मात्र आपल्या झुंजारपणासाठी जाणल्या जाणाऱ्या यशस्वी जयस्वाल अन् कायापालट झालेला रियान पराग यांनी राजस्थानला सावरलं. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची पार्टनरशिप केली. या दोघांनी राजस्थानला 14 व्या ओव्हरमध्येच 135 रन्सपर्यंत पोहचवलं होतं. राजस्थाननं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती.

आता स्लॉग ओव्हर सुरू होणार होते. त्यामुळं राजस्थान हा सामना आरामात खिशात टाकणार अन् प्ले ऑफ गाठणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र टी नटराजननं 68 रन्स करणाऱ्या यशस्वीची दांडी गुल केली. त्यानंतर रियान पराग अन् हेटमार यांनी राजस्थानला 150 रन्सचा टप्पा पार करून दिला. रियाननं 77 रन्सचं योगदान दिलं. राजस्थान 16 ओव्हरमध्ये 160 धावांपर्यंत पोहचली.

तेवढच्यात कमिन्सनं रियानची शिकार केली अन् राजस्थानच्या विजयाला ग्रहण लागण्यास सुरूवात झाली. नटारजननं हेटमायरला 18 व्या ओव्हरमध्ये बाद केलं अन् राजस्थानचं टेन्शन वाढलं. राजस्थानचा निम्मा संघ 181 रन्समध्येच गार झाला होता.

Pat Cummins SRH vs RR
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

आता मदार ध्रुव जुरेल अन् रोव्हमन पॉवेल यांच्यावर होती. दोघंही पॉवर हिटिंगसाठी ओळखले जातात त्यामुळं मॅचचं पारडं अजून राजस्थानच्या बाजून झुकलं होतं. 12 बॉलमध्ये 20 रन्स असं इक्वेशन होतं. मात्र कमिन्सन 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जुरेलला बाद केलं. या षटकात कमिन्सनं फक्त 7 रन्स दिल्या. 16 व्या ओव्हरमध्ये देखील कमिन्स फक्त 3 धावा दिल्या होत्या.

सामना आता 6 बॉल अन् 13 रन्स असा आला. अश्विन अन् पॉवेलनं भाग मिल्खा भाग स्टाईलनं धावा करत सामना जवळ आणला होता. पॉवेलच्या बाऊंड्रीनं सामना 2 बॉलमध्ये 4 रन्स असा आला. पॉवेल अन् अश्विननं जीव तोडून दोन रन्स पळून काढल्या. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. राजस्थान निदान सामना टाय करेल सुपर ओव्हर होईल असं वाटत होतं. मात्र भुवीच्या परफेक्ट यॉर्करनं पॉवेलच्या पॅडचा वेध घेतला अन् हैदराबादनं शेवटच्या चेंडूवर सामना एक रननं जिंकला!

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com