SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

SRH vs RR Live IPL 2024
SRH vs RR Live IPL 2024esakal

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

शेवटच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी 2 धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारने रोव्हमन पॉवेलला पायचीत बाद करत हैदराबादला सामना 1 धावेने जिंकून दिला.

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

नितीश रेड्डीने 76 धावा केल्या तर क्लासेनने 19 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. याच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकात 3 बाद 203 धावा केल्या आहेत.

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

आवेश खानने 58 धावा करणाऱ्या ट्रॅविस हेडला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला.

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

ट्रॅविस हेडने अर्धशतकी खेळी करत हैदराबादला 12 षटकात शंभरच्या जवळ पोहचवलं. त्याला नितीश रेड्डीने चांगली साथ दिली. हैदराबादने 12 षटकात 2 बाद 92 धावा केल्या होत्या.

राजस्थानने हैदराबादला दिले दोन धक्के 

राजस्थान रॉयल्सने सनराईजर्स हैदराबादला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के दिले. आवेश खानने अभिषेक शर्माला आणि संदीप शर्माने अमोलप्रीत सिंहला बाद केलं. हैदराबादने 6 षटकात 2 बाद 37 धावा केल्या.

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals Live : राजस्थान प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी ताकद लावणार

सनराईजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 1 धावेने पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. हैदराबादचे 201 धावांचे आव्हान पार करताना राजस्थान 200 धावांपर्यंत मजल मारली. पॉवेलने 15 चेंडूत 27 धावा करत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रियान परागनेही 77 धावांची दमदार खेळी केली होती. त्याला सलामीवीर यशस्वी जयस्वालने 68 धावा करून चांगली साथ दिली. मात्र पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमारने शेवटच्या दोन षटकात सामना खेचून आणला.

सनराईजर्स हैदराबादचे 201 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. भुवनेश्वर कुमारने जोस बटलर आणि संजू सॅमसनला शुन्यावर बाद केलं.

या मोठ्या झटक्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रियान परागने डाव सावरला. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत 10 षटकात राजस्थानला शतकी मजल मारून दिली.

सनराईजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या. अडखळती सुरूवात करणाऱ्या हैदराबादने स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली. सलामीवीर ट्रॅविस हेड 58 धावा करून बाद झाल्यानंतर नितीश रेड्डीने 76 धावांची खेळी केली. तर हेन्री क्लासेनने 19 चेंडूत नाबाद 42 धावा ठोकल्या. यामुळे हैदराबाद 20 षटकात 3 बाद 201 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खानने दोन विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com