Prabhsimran Singh DC vs PBKS
Prabhsimran Singh DC vs PBKS esakal

Prabhsimran Singh DC vs PBKS : प्रभसिमरनने ठोकले आयपीएलमधील पहिले शतक बाकी पंजाबचे शेर झाले ढेर

Prabhsimran Singh DC vs PBKS : आयपीएलच्या 59 व्या सामन्यात आज तळातील दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्जला भिडत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जत्या जवळपास सर्वच फलंदाजांना चांगले दमवले. मात्र दिल्लीच्या सर्व गोलंदाजांना एकटा प्रभसिमरन सिंह पुरून उरला. त्याने 65 चेंडूत 103 धावा ठोकत आपले आयपीएलमधील पहिले शतक दिमाखात पूर्ण केले.

या खेळीत त्याने 6 षटकार आणि 10 चौकार मारले. प्रभसिमरन सोडून फक्त दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. सॅम करनने 20 तर सिकंदर रझाने 11 धावा केल्या. दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी चांगला मारा केल्यामुळे पंजाबला 20 षटकात 7 बाद 167 धावाच करता आल्या.

Prabhsimran Singh DC vs PBKS
Amit Mishra SRH vs LSG : लखनौची मस्ती काही जात नाही! आरसीबी पाठोपाठ हैदराबादविरूद्धही आदळ-आपट, खुन्नस सुरूच

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पंजाब किंग्जची अवस्था 3 बाद 45 धावा अशी केली. इशांत शर्माने पहिल्यांदा शिखर धवनला 7 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशांतने लिम लिव्हिंगस्टोनचा 4 धावांवर त्रिफळा उडवला. या दोन धक्क्यातून प्रभसिमरन पंजाबला सावरत असतानाच अक्षर पटेलने जितेश शर्माला बाद केले.

जितेश शर्मा बाद झाल्यानंतर प्रभसिमरन सिंगने सॅम करनला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत सॅम करनचे फक्त 20 धावांचेच योगदान होते. अर्धशतक पूर्ण केलेल्या प्रभसिमरनची साथ सॅम करनने 15 व्या षटकात सोडली. त्यानंतर हरप्रीत ब्रार 2 धावांची भर घालून परतला.

Prabhsimran Singh DC vs PBKS
Hardik Pandya Injured : मुंबईविरूद्ध नाही केली गोलंदाजी; हार्दिक पांड्याला पुन्हा झाली दुखापत?

दरम्यान, सेट झालेल्या प्रभसिमरनने फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. याचबरोबर पंजाबने देखील दीडशतकी मजल मारली होती. मात्र प्रभसिमरनची ही शतकी खेळी मुकेश कुमारने संपवली. यानंतर सिकंदर रझाने 7 चेंडूत 11 धावा करत पंजाबला 20 षटकात 7 बाद 167 धावांपर्यंत पोहचवले. दिल्लीकडून इशांत शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि प्रविण दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com