पहिल्या IPL वेळी कोहली ऐवजी या खेळाडूची केली होती निवड; अजूनही चालूय स्ट्रगल | Pradeep Sangwan Journey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pradeep sangwan journey started with virat kohli ipl

पहिल्या IPL वेळी कोहली ऐवजी या खेळाडूची केली होती निवड; अजूनही चालूय स्ट्रगल

Pradeep Sangwan: गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएल 2022 चा 43 वा सामना खेळला जात आहे. गुजरातने यश दयालच्या जागी प्रदीप सांगवानला (Pradeep Sangwan) संघात सामील केले आहे. सांगवान आयपीएलमध्ये 4 वर्षानंतर पुनरागमन करत आहे. 2018 मध्ये आयपीएलचा प्रदीपने शेवटचा सामना खेळला होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली IPL 2008 च्या काही महिन्यांपूर्वी भारताने 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. पहिल्या आयपीएल हंगामासाठी 19 वर्षांखालील खेळाडूंची संघांनी ड्राफ्टद्वारे निवड केले होते. त्यावेळी वीरेंद्र सेहवागच्या दिल्लीने विराट कोहलीच्या ऐवजी प्रदीप सांगवानची संघात निवड केली. मग विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोणताही संकोच न करता आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर कोहलीने कधीच मागे वळून पाहिले नाही. आणि त्याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज जागतिक क्रिकेटमध्ये कोहलीची स्वतःची वेगळी ओळख आहे.

हेही वाचा: शुभमनची एलॉन मस्कला विनंती, 'स्विगी सुद्धा विकत घ्या' चाहत्यांनी केले ट्रोल

प्रदीप संगवाने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या हंगामात या खेळाडूने 7 सामन्यात केवळ 5 विकेट घेतल्या, परंतु त्याचे गोलंदाजी अप्रतिम होता. IPL 2009 मध्ये प्रदीप संगवानने 13 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये सांगवानने केवळ 39 सामने खेळले असून त्यात त्याने 35 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली आरसीबीचा एक भाग आहे. आरसीबीकडून 15 वर्षे खेळताना विराट कोहलीने 217 सामन्यात आयपीएलमध्ये सर्वाधिक 6435 धावा केल्या आहेत.

Web Title: Pradeep Sangwan Journey Started With Virat Kohli Ipl 2008 To Travelling Gujarat Titans Bowler Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top