Prithvi Shaw News : IPLच्या धुमाळीत पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या! मुंबईत गुन्हा दाखल

pritivi shaw Vs Sapana Gill  amid ipl 2023 sapna gill filed complaint against pritivi shaw accused of molestation
pritivi shaw Vs Sapana Gill amid ipl 2023 sapna gill filed complaint against pritivi shaw accused of molestation esakal

आयपीएल (IPL 2023) मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉसाठी अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे आणि त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे. पण या सगळ्यात पृथ्वी शॉसाठी आणखी एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. आता पृथ्वी शॉ विरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अडचणी वाढल्या..

ही तक्रार सोशल मीडिया इन्फ्लुअंसर सपना गिल हिने पृथ्वीविरोधात दाखल केली आहे.या तक्रारीत सपनाकडून पृथ्वी शॉ आणि त्याचा जवळचा मित्र आशिष सुरेंद्र यांना आरोपी करण्यात आले आहे.

ही तक्रार सपना गिलसोबत झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणात करण्यात आली आहे. सपनाने तिच्या तक्रारीत सरकारी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवालही जोडला आहे. आयपीसीच्या कलम 354, 509 आणि 324 अंतर्गत शॉविरोधात तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

pritivi shaw Vs Sapana Gill  amid ipl 2023 sapna gill filed complaint against pritivi shaw accused of molestation
IPL 2023: अश्विनने धवनला दिला मंकडिंगचा इशारा अन् बटलरच्या डोक्यात आल्या मुंग्या... व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, सपना गिलने पृथ्वी आणि त्याच्या मित्राविरुद्ध तसेच मुंबई पोलीस अधिकारी सतीश कावणकर आणि भागवत गरंडे यांच्याविरोधात देखील तक्रार दाखल केली आहे. ज्यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र आता या दोन्ही प्रकरणांवर 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे मानले जात आहे.

pritivi shaw Vs Sapana Gill  amid ipl 2023 sapna gill filed complaint against pritivi shaw accused of molestation
IPL 2023 : 'नशीब इथं उर्वशी नाही...', LIVE मॅचमध्ये पंतच्या फॅननं केलं असं कृत्य, अभिनेत्री संतापली

जरी IPL 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पृथ्वी शॉची बॅट दिल्ली कॅपिटल्ससाठी फार काही कमाल दाखवू शकलेली नाहीये. पण शॉने कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगीरी चांगली राहिली आहे. शॉने आयपीएलमध्ये दिल्लीला अनेक वेळा चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याचबरोबर आगामी सामन्यांमध्ये तो दिल्लीसाठी चांगली कामगिरी करेल, अशी शॉकडून अपेक्षा असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com