esakal | ...अन् तिने धोनीच्या पत्नीसमोर माहीसाठी केले असे काही | I Love You
sakal

बोलून बातमी शोधा

mahendra singh dhoni

...अन् तिने धोनीच्या पत्नीसमोर माहीसाठी केले असे काही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : वर्षभरापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, तो इंडियन प्रिमिअर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची लोकप्रियता काहीही कमी झालेली दिसत नाही. याचा प्रत्यय सोमवारी पार पडलेल्या सामन्यात दिसून आला. एका मुलीचा वडील असलेल्या धोनीला तिच्या चाहतीने चक्का सामन्यादरम्यान प्रपोज केला.

सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि डेक्कन कॅपिटल यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना चेन्नई हरला असला तरी चेन्नई उपांत्य फेरीसाठी क्वालीफाई झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चिंतेची बाब नाही. या सामन्यात चेन्नई व धोनीला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मैदानात हजर होते.

हेही वाचा: टूथपिक वापरताय? याकडे द्या लक्ष

या फॅन्समधील एका मुलीने चक्क धोनील प्रपोज केला. मुलीने मॅच सुरू असताना पोस्टर दाखवले. या पोस्टरवर ‘माझा भावी साथीदार मला माफ कर, पण एमएस धोनी नेहमीच माझे पहिले प्रेम असेल. मी तुझ्यावर प्रेम करते माही’ असे लिहिले होते. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी मैदानात धोनीची पत्नी हजर होती. मुलीने प्रपोज केल्याने तिच्या मनावर कोणता परिणाम झाल हे तिलाच माहिती. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

२०१८ ची पुनरावृत्ती

२०१८ मध्ये पार पडलेल्या आयपीएलमध्ये सुद्धा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला महिला फॅनने प्रपोज केले होते. धोनीला पाहून ती स्वतःला आपले प्रेम व्यक्त करण्यापासून रोखू शकला नव्हती. त्यावेळीही धोनीची पत्नी साक्षी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

आयसीसीने शेअर केला फोटो

धोनी किती प्रसिद्ध आहे, हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. त्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. यामुळेच की काय आयसीसीसुद्धा धोनीला प्रपोज केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. धोनीच्या चाहत्यांनीही फोटोला भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

loading image
go to top